अपघात
Yavatmal: वणी येथील हॉटेल रसोई भीषण आगीत जळून खाक सर्व साहित्यही आगीत भस्मसात
यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील मुख्य मार्गावर असलेल्या हॉटेल रसोईला रात्री भीषण आग लागली या आगीत हॉटेलमधील सर्व साहित्य जाऊन खाक झाले आहे .
साई मंदिरच्या जवळ असलेल्या या हॉटेलला अचानक आग लागली आणि आगीने लगेच रौद्ररूप धारण केलं .या रसोई हॉटेलमध्ये सर्व साहित्य आगीत जळून खाक झाले आहे .
आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून ही आग ही नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट नाही .मात्र रात्रीच्या सुमारास ही आग लागली आहे .
अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र हॉटेल चालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.